‘सोशल मीडिया’च्या तीव्र कोलाहलात स्वतःचा आवाज हरवू न देणाऱ्यांसाठी आणि सजग नागरिक म्हणून आपली भूमिका न सोडणाऱ्यांसाठी महत्त्वाचे पुस्तक!
“Today we live in a society in which spurious realities are manufactured by the media, by governments, by big corporations, by religious groups...so what is real?” या वाक्याचा असा अर्थ होतो की, “आज आपण अशा समाजात राहत आहोत जेथे सरकार, माध्यमे, धार्मिक संस्था आणि मोठे बहुराष्ट्रीय उद्योग हे सर्व बनावट, नकली वास्तवाचा आभास निर्माण करत आहेत. या पुस्तकामध्ये पत्रकारितेच्या दुर्बिणीतून भारताच्या बदलत गेलेल्या आणि बदलत चाललेल्या राजकीय संवाद संस्कृती-शैलीचे कवडसे टिपण्याचा सुंदर प्रयत्न आहे.......